तुम्ही पण चिकन शिजवण्यापूर्वी धुता का? जर असं करत असाल तर वेळीच थांबा...

कारण  द कॉन्व्हरसेशनमधील एका अहवालानुसार, जगभरातील अन्न सुरक्षा संशोधक आणि अधिकारी असे सांगतात की, शिजायला टाकण्याआधी चिकन धुवू नका.

कारण चिकन धुतल्याने स्वयंपाकघरात धोकादायक जीवाणू पसरतात. मग कसं धुवायचं चिकन? जाणून घ्या...

तज्ज्ञांच्या मते, चिकन नळाखाली धुण्याऐवजी ते योग्य तापमानावर पूर्णपणे शिजवणं फायद्याचं ठरेल. पण त्याशिवाय चिकन कसं साफ करायचं ते आपण समजून घेऊयात.

चिकनवरील रक्त, अस्वच्छ घटक तुम्ही टिश्यूपेपरनं काढू शकता.

चिकन कायम गरम पाण्याने धुवा. त्या पाण्यात मीठ आणि हळद टाका. आता या उकळत्या पाण्यात चिकन जरा वेळ ठेवा आणि नंतर ते धुवा.

याशिवाय चिकन गरम पाण्याने धुतल्यावर त्याला मीठ आणि हळद लावून ठेवा यामुळेही विषाणू मरतात.

मांस जर फ्रिजमध्ये ठेवणार असाल तर ते हवाबंद डब्यांमध्ये फ्रिजरमध्ये ठेवा. जेव्हा तुम्हाला ते शिजवायचं असेल तर साधणार दोन तासापूर्वी फ्रीजरबाहेर काढावे.

चिकन, मटण आणि मासे स्वच्छ करण्यासाठी वापरण्यात येणारे भांडे, सुरी अगदी सिंकही गरम पाण्याने धुवावे.