उन्हाळ्यात बीअर पिणं जास्त पसंत केलं जातं. मात्र, शरीरासाठी ते हानिकारक ठरू शकतं. 

बीअर प्यायल्याने शरीराचे तापमान झपाट्याने वाढू लागते, त्यामुळे जास्त घाम येतो.

अल्कोहोलमध्ये इथेनॉल असते, त्यामुळे लघवी प्रमाणपेक्षा जास्त होते. डिहायड्रेशनची समस्या यामुळे होऊ शकते.

मधुमेह, उच्च रक्तदाब आणि फुफ्फुस, यकृत, मूत्रपिंड, हृदयविकाराच्या रुग्णांना उन्हाळ्यात बीअर प्यायल्याने जास्त त्रास होतो.

कॉकटेलमध्ये भरपूर साखर असते, ज्यामुळे ऑस्मोटिक डायरेसिस होऊ शकते.

रिकाम्या पोटी बीअर प्यायल्याने धोका वाढतो, अल्कोहोल थेट रक्तात पोहोचते.

उन्हाळ्यात बीअर किंवा इतर कोणतेही अल्कोहोल पेय पिण्यापेक्षा पाणी पिण्यावरच भर द्यावा.