शरीरसुखाचा संबंध थेट वृद्धत्वाशी का आहे, आचार्य चाणक्य म्हणतात...
वयोमानाने येणारे म्हातारपण आपण थोपवू शकत नाही, परंतु मनाने चिरतरुण राहण्यासाठी कोणते उपाय करायला हवेत, याबाबत आचार्य चाणक्यांनी माहिती सांगितली आहे.
आचार्य चाणक्य हे भारताचे महान तत्त्वज्ञ आणि मुत्सद्दी मानले जातात. त्यांनी मानवी जीवनाविषयी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत
ज्या नीतीशास्त्रात संकलित केल्या आहेत. लोक याला चाणक्य नीती या नावाने ओळखतात.
परंतु जी व्यक्ती मनाने खचते ती अकाली वृद्ध होते
अन्नाची भूक जेवढी महत्त्वाची तेवढीच शारीरिक भूकदेखील महत्त्वाची आहे आणि ती नैसर्गिक आहे. योग्य वयात ती शमली नाही, तर स्त्री पुरुष अनैतिक मार्ग अवलंबू शकतात. आणि ते सुख मिळाले नाही तर कदाचित आक्रस्ताळेपणा वाढू शकतो किंवा नैराश्याने मनुष्य खचून जाऊ शकतो.
लग्न वेळेत करून या सुखाची पूर्ती केली असता वासनेवर नियंत्रण राहते आणि परमार्थाकडे जीवन वळवता येते.
जे लोक प्रवास करत नाहीत ते लवकर वृद्ध होतात, याउलट जे लोक खूप प्रवास करतात, निसर्गात रमतात, अनेक लोक जोडतात, ते लोक कायम उत्साही आणि सकारात्मक राहतात. त्यामुळे त्यांचा मेंदू सतेज राहतो आणि अकाली वृद्धत्व येत नाही.
बंधनात अडकलेले लोक कुढत आयुष्य काढतात. ते बंधन कोणी लादलेले असू शकते किंवा परिस्थितीने स्वीकारलेले असू शकते. बंधनाच्या ओझ्याखाली मनुष्य झुकतो आणि कणाहीन होतो.
याचा अर्थ जबाबदाऱ्या अंगावर घ्यायच्याच नाहीत असे नाही, तर त्या बंधनातून स्वतःसाठी पूरक वेळ काढावा आणि आपल्या स्वप्नांना पंख द्यावेत.
अन्यथा वय उलटून जाते आणि जबाबदाऱ्या संपत नाहीत अशी स्थिती निर्माण होते. तरुण वयातच पोक्त विचारांनी व्यक्तीच्या वागण्या बोलण्यात वृद्धत्व डोकावू लागते आणि माणूस एकाकी पडतो.