झाडे आणि वनस्पतींनाही जगण्यासाठी पाण्याची गरज असते.
मात्र, जास्त प्रमाणात पाणी घातल्याने रोपं कोमेजूनही जाऊ शकतात
त्यामुळे झाडांना पाणी देताना प्रमाण आणि मातीची आर्द्रता तपासली पाहिजे.
त्याशिवाय झाडाला पाणी कधी द्यावे याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे.
झाडांना पाणी देण्यासाठी सकाळ आणि संध्याकाळची वेळ उत्तम मानली जाते.
या वेळेत झाडांची मुळे पाणी चांगल्या प्रकारे शोषून घेतात.
दुपारच्या वेळी जेव्हा झाडांना पाणी दिल्यास तेव्हा माती खूप गरम असते.
माती गरम असल्याने पाण्याचे बाष्पात रुपांतर होते, ते मुळांपर्यंत पोहोचू शकत नाही.