भारतातल्या प्रत्येक शहराची वेगवेगळी वैशिष्ट्यं आहेत.
भारतात अशीही काही शहरं आहेत जी त्यांच्या रंगांवरून ओळखली जातात.
भारतातील जयपूर हे शहर ‘पिंक सिटी’ म्हणून ओळखलं जातं.
प्रिन्स अल्बर्टच्या स्वागतासाठी सवाई राम सिंह (द्वितीय) यांनी 1876 मध्ये जयपूर शहराला गुलाबी रंग दिला.
जोधपूर हे शहर ब्लू सिटी म्हणून ओळखलं जातं.
जोधपूरला सन सिटी देखील म्हणतात.
उदयपूर या शहराची ओळख व्हाइट सिटी अशी आहे.
संगमरवरी दगडाने बनवलेल्या अनेक वास्तू या शहरामध्ये आहेत.
जैसलमेर या शहराला गोल्डन सिटी म्हटलं जातं.
जैसलमेर शहरातल्या काही प्राचीन वास्तू पिवळ्या वाळूच्या दगडापासून बनवलेल्या आहेत.