'सिटी ऑफ ड्रीम्स'मुळे प्रिया बापट सध्या चर्चेत आहे. 

या सीरिजचा तिसरा सीझन नुकताच रिलीज झाला आहे, प्रिया बापटच्या कामाचं कौतुक होत आहे. 

 आधीच्या दोन्ही सीरिजला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला होता. तिसऱ्या सीझनलाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. 

सीरिजमधील किसींग सीनवर प्रिया पहिल्यांदाच व्यक्त झाली. 

प्रिया बापट म्हणाली, "तो सीन अचानक व्हायरल झाल्याने दोन दिवस त्रास झाला."

लेसबीयन भूमिका साकारल्यामुळे प्रियाला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आलं होतं. 

पुढे प्रिया बापट म्हणाली, "कामाची आणि गोष्टीची गरज होती म्हणून मी स्वीकारलं."

प्रिया म्हणते, "ते माझं काम होतं, मी ते करून बाहेर पडले, लोकं मात्र त्याबद्दल चर्चा करतात."

"लोकं आता काय म्हणतील याची अजिबात मला काळजी वाटत नाही, काम आवडेल, तेव्हा लोकं शांतपणे स्वीकारतील"