किचन प्लॅटफॉर्म नेहमीच खराब होतो, तो आपण फडक्याने स्वच्छ करतो.
अनेक वेळा हळद, तेल यांचे डाग पटकन निघत नाहीत.
प्लॅटफॉर्मवरचे हे डाग घालवण्यासाठी या टिप्स फॉलो करा.
टूथपेस्ट हळदीच्या डागांवर लावा, थोड्यावेळाने ओल्या फडक्याने पुसून घ्या.
1 चमचा बेकिंग सोड्यात लिंबाचा रस घालून ते मिश्रण डागांवर 10 मिनिटे लावा.
त्यानंतर हे डाग घासून स्वच्छ करा, प्लॅटफॉर्म नक्की चमकेल.
लिंबामध्ये व्हिनेगर मिसळूनही तुम्ही पिवळे डाग घालवू शकता.
डिशवॉशिंग साबण किंवा कोणताही लिक्विड सोप हळदीचे डाग स्वच्छ करेल
थोडावेळ हे लिक्विड डागांवर लावून ठेवा, नंतर घासून स्वच्छ करा.