काही घरगुती उपायांनी झुरळांना बाहेर काढा.
मिरचीच्या तेलात मीठ पाणी मिसळा आणि ज्या ठिकाणी झुरळ जास्त दिसतील त्या ठिकाणी शिंपडा.
बेकिंग सोड्यामध्ये साखर मिसळा आणि झुरळं जास्त दिसतात अशा ठिकाणी लावा.
पाण्यात कडुनिंबाचे तेल मिसळा आणि झुरळांच्या ठिकाणी शिंपडा.
लवंगच्या वासानेही झुरळं घराबाहेर जातात.
केरोसीन ऑईल हासुद्धा झुरळांना घालवायचा एक चांगला उपाय आहे.
तमालपत्र बारीक बारीक तुकडे करून जिथे झुरळं जास्त आहेत अशा ठिकाणी टाका.
घरातील भेगाही व्हाइट सिमेंटने भरा, कारण तिथे झुरळं अंडी घालतात.