Published Feb 1, 2025
By Harshada Jadhav
Pic Credit - pinterest
पृथ्वीवर आढळणाऱ्या सर्व प्राण्यांची रचना आणि विशिष्ट वैशिष्ट्ये भिन्न असतात.
आज तुम्हाला अशा प्राण्याबद्दल सांगणार आहोत, ज्याची शरीर रचना सर्वात मजबूत मानली जाते.
एवढेच नाही तर या प्राण्यावर कोणी पाय ठेवला तरी ते लवकर मरत नाही.
झुरळ हा पृथ्वीवरील सर्वात जुना कीटक मानला जातो.
अंटार्क्टिका वगळता जगात सर्वत्र झुरळे आढळतात.
अशी अनेक वैशिष्ट्ये आहेत, ज्यामुळे झुरळ इतर कीटकांपेक्षा वेगळे बनतं.
झुरळांच्या शरीराची रचना अशी आहे की ते अगदी अरुंद विवरांमध्येही प्रवेश करू शकतात.
झुरळांच्या शरीरावर त्यांच्या संरक्षणासाठी एक चिलखत असते.
चिलखतामुळे त्यांचे संरक्षण होते आणि ते लवकर मरत नाही.
झुरळांना तुम्ही शूजने तुडवले तरीही ते जिवंत राहतात.
धोक्याची जाणीव होताच झुरळं आकुंचन पावतात आणि गोलाकार होतात.