पूजेत नारळाला विशेष महत्त्व आहे. कोणत्याही शुभकार्यात नारळ वापरला जातो.
नारळाच्या वापराने अनेक प्रकारचे दोष दूर होतात असे शास्त्रात सांगण्यात आले आहे.
जाणून घेऊया पूजेत नारळाचे विशेष महत्त्व का आहे?
त्रिदेव म्हणजेच ब्रह्मा, विष्णू आणि महेश नारळात वास करतात असं म्हटलं जातं.
शास्त्रात असेही सांगितले आहे की, घरामध्ये नारळपाणी शिंपडल्यास सर्व नकारात्मक शक्ती नष्ट होतात.
देवी-देवतांना नारळ अर्पण केल्याने सर्व प्रकारचे दुःख दूर होतात, तसेच मनोकामनाही पूर्ण होतात.
ज्योतिषशास्त्रात नारळाचे पाणी चंद्राचे प्रतीक मानले जाते.
असे मानले जाते की नारळ फोडल्याने शुभ कार्ये विना अडथळा पूर्ण होतात.
नारळ अर्पण केल्याने लक्ष्मीची कृपा तुमच्यावर राहते. असे केल्याने घरात सुख-समृद्धी येते.