अभिनेत्री तापसी पन्नू सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असते. आता तिच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

रिविलींग ड्रेसवर लक्ष्मीची मुर्ती असलेला नेकपीस घातल्याने तिच्याविरुद्ध धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे.

काही आठवड्यांपूर्वी, लॅक्मे फॅशन वीकमध्ये तापसी लाल रंगाचा ड्रेस घालून रॅम्पवर आली. या  ड्रेसमुळे ती चर्चेत आली आहे.

एकलव्य सिंह गौर नावाच्या व्यक्तीने तापसीविरोधात ही तक्रार दाखल केली आहे.

आता यामुळे सोशल मिडियावर तिला लोकांनी ट्रोल करायला सुरुवाक केली आहे.