Hot & Cold AC म्हणजे काय? उन्हाळ्यात थंडावा तर हिवाळ्यात गरम हवा, कसे करते दोन्ही कामे?

Science Technology

20 Nov 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

Hot & Cold AC हे सामान्य AC प्रमाणे खोली थंड करू शकते. मात्र, यात खोली गरम करण्याची सुविधाही असते. त्यामुळे वेगळ्या हीटरची गरज कमी होते.

दोन ऋतूंसाठी एकच AC

Picture Credit:pinterest

उन्हाळ्यात AC खोलीतील उष्णता शोषून घेतो आणि ती बाहेर सोडतो. यामुळे खोलीतील तापमान कमी होऊन थंडावा मिळतो.

कूलिंग मोड कसा काम करतो?

Picture Credit:pinterest

हिवाळ्यात हे AC उलट पद्धतीने काम करते. बाहेरील हवेतून उष्णता शोषून ती घराच्या आत सोडते. त्यामुळे खोली उबदार होते.

हिटिंग मोडमध्ये काय होते?

Picture Credit:pinterest

Hot & Cold AC मध्ये प्रामुख्याने Heat Pump Technology वापरली जाते. रेफ्रिजरंट आणि रिव्हर्सिंग व्हॉल्व्हच्या मदतीने उष्णतेचा प्रवाह बदलला जातो.

Heat Pump Technology काय आहे?

Picture Credit:pinterest

या AC मधील Reversing Valve रेफ्रिजरंटचा प्रवाह उलटवतो. त्यामुळे कूलिंग मोडमध्ये उष्णता बाहेर जाते, तर हिटिंग मोडमध्ये उष्णता घरात आणली जाते.

Reversing Valve ची भूमिका

Picture Credit:pinterest

इलेक्ट्रिक हीटरच्या तुलनेत Heat Pump AC कमी विजेत अधिक उष्णता निर्माण करू शकते. मात्र, प्रत्यक्ष वीज वापर AC ची कार्यक्षमता आणि बाहेरील तापमानावर अवलंबून असतो.

वीज किती खर्च होते?

Picture Credit:pinterest

– उन्हाळा आणि हिवाळा दोन्हींसाठी उपयोगी – स्वतंत्र हीटरची गरज कमी – एकाच मशीनमधून कूलिंग आणि हीटिंग – योग्य परिस्थितीत विजेची बचत

Hot & Cold AC चे फायदे

Picture Credit:pinterest

Hot & Cold AC खरेदी करताना Heating Capacity, Cooling Capacity, Inverter Technology, स्टार रेटिंग आणि कमी तापमानात काम करण्याची क्षमता तपासा. तुमच्या भागातील हवामानानुसार योग्य मॉडेल निवडा.

AC खरेदी करताना काय पाहावे?

Picture Credit:pinterest