तांब्याच्या भांड्यात अन्न शिजवणं, पाणी पिणं फायदेशीर मानले जाते, परंतु फार कमी लोक आपल्या घरात याचा वापर करतात.
ठराविक काळानंतर तांब्याची भांडी काळी, जीर्ण आणि जुनी दिसतात.
या उपायांनी तांब्याची भांडी कशी चमकवायची ते जाणून घ्या.
लिंबू आणि मीठाने तांब्याची भांडी घासावी, नव्यासारखी चमकतील.
चिंचेचा कोळही तांब्याची भांडी घासण्यासाठी उपयोगी पडतो.
व्हिनेगरनेही तांब्याची भांडी घासल्यास चमकतील.
व्हिनेगर आणि मीठ तांब्याच्या भांड्यांची चमक परत आणण्यासाठी खूप मदत करतात.
या टिप्स वापरून डाग पडलेली तांब्याची भांडी घासा.