कोथिंबिरीत व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के आणि अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म आढळतात.
दररोज सकाळी रिकाम्या पोटी कोथिंबिरीचं पाणी प्यायल्यास आरोग्याशी संबंधित अनेक समस्या दूर होऊ शकतात.
कोथिंबीरमध्ये अँटीमायक्रोबियल, अँटीबायोटिक, अँटीऑक्सिडंट, अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्मही आहेत.
सकाळी रिकाम्या पोटी हिरवी कोथिंबीर कच्ची खाल्ल्याने अनेक फायदे होऊ शकतात.
कोथिंबीर शरीरातून अतिरिक्त सोडियम काढून टाकते. इतकंच नाही तर ते कोलेस्ट्रॉलची समस्याही दूर करू शकते.
कोथिंबिरीमध्ये व्हिटॅमिन-ए, व्हिटॅमिन-सी, व्हिटॅमिन-ई असे अनेक पोषक घटक आहेत ज्यामुळे दृष्टी सुधारते. डोळ्यांच्या आरोग्यासाठी तुम्ही रोज कोथिंबिरीचे पाणी पिऊ शकता.
कोथिंबिरीमध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के आणि इतर घटक असल्याने केस मजबूत करण्यासाठी ते उपयुक्त ठरतात.
कोथिंबिरीच्या सेवनाने शरीराची सूज येण्याची समस्या कमी होते.