या दशकातील सर्वात शक्तिशाली चक्रीवादळांपैकी एक असलेल्या 'मोचा'ने  रविवारी बांग्लादेश आणि म्यानमारला धडक दिली.

चक्रीवादळ धडकल्यानंतर या दोन्ही देशांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. 

म्यानमारमध्ये सुमारे 6 जणांचा मृत्यू, बांग्लादेशमध्ये अनेक जण जखमी

घरे, इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मर, मोबाईल फोन टॉवरसह अनेक वस्तूंचे नुकसान झाले आहे.

जोरदार वाहणाऱ्या वाऱ्यामुळे झाडंही उन्मळून पडली आहेत. 

अनेक लोकं बेघर झाले आहेत, अनेकांनी मठ आणि शाळांचा आसरा घेतलेला आहे. 

 या वादळाचा बांगलादेशावरही परिणाम झाला. मात्र, हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार ढाकामध्ये धोक्याची पातळी खूपच कमी होती.

वादळाचा धोका लक्षात घेऊन बांगलादेशच्या किनारी भागातून हजारो लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे.

शास्त्रज्ञांच्या मते, 1982 नंतर मे महिन्यात बंगालच्या उपसागरात धडकणारे हे सर्वात वेगवान चक्रीवादळ आहे.