‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेतल्या दयाबेनच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे.
पाच वर्ष दयाबेन
फेम दिशा वकानीने मुलांसाठी ब्रेक घेतला होता.मात्र आता मालिकेत ती पुन्हा दिसणार आहे.
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेत दिलीप जोशी जेठालालची भूमिका करतात त्यांच्या बायकोचं नाव दयाबेन दाखवण्यात आलं आहे.
दिशा वकानीने 2017 मध्ये ब्रेक घेतला होता. तेव्हापासून फक्त प्रेक्षकच नाही तर मालिकेचे निर्मातेही ती परत येण्याची वाट बघत होते.
असित मोदी नवीन दयाबेनच्या शोधात होते, पण दिशासारखी अभिनेत्री त्यांना मिळाली नाही. त्यामुळे ते दिशाला परत आणण्यासाठी प्रयत्न करत होते.
मालिकेचे निर्माते असित मोदी यांनीच दिशा वकानी शोमध्ये पुनरागमन करणार असल्याचं सांगितलंय.
मालिकेला 15 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं, त्यावेळी असित मोदी यांनी दिशा कमबॅक करणार असल्याचं सांगितलं.
दयाबेनच्या परत येण्याने मालिकेची रंगत वाढणार आहे.
दया भाभी पुन्हा एकदा प्रेक्षकांना हसवायला सज्ज झाली आहे.