राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी ट्विटरवरून अज्ञात व्यक्तीने दिली आहे
या धमकीची गंभीर दखल घेत खा. सुप्रिया सुळेंनी पोलीस आयुक्तांची भेट घेत कारवाईची मागणी केली
याआधी देखील केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना धमकीचा फोन आला होता
यापूर्वी खासदार संजय राऊतांना देखील जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती
तसेच भाजपा आमदार आशिष शेलार यांनाही धमकीचा देण्यात आली होती
राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना सुद्धा धमकी देण्यात आली होती
यानंतर आज संजय राऊत यांचे भाऊ सुनील राऊतांनाही धमकी देण्यात आलेय
आज पुन्हा एकदा शरद पवारांना धमकी देण्यात आल्यामुळं राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे