भारतीय रेल्वेच्या इतिहासातली पहिली डिलक्स रेल्वे दख्खनची राणी

ेsource : twitter - @Central_Railway

93 वर्ष होऊनही आजही आहे इतिहासातलं सुवर्ण पान

source : twitter - @Central_Railway

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठी ट्रेन रवाना होण्यापूर्वी रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी मोठ्या दिमाखात आज वाढदिवस साजरा केला.

पुणे रेल्वे स्थानकावर दोन मोठे केक कापून जंगी सेलिब्रेशन करण्यात आलं.

भारतीय रेल्वेची पहिली डिलक्स ट्रेन असलेल्या आयकॉनिक डेक्कन क्वीनने गुरुवारी पुणे-मुंबई दरम्यानच्या आपल्या अविरत सेवेची 93 वर्षे पूर्ण केली.

यावेळी पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटीलही उपस्थित होते.

गेल्या 93 वर्षांच्या रंगीबेरंगी इतिहासात, ट्रेन दोन शहरांमधील वाहतुकीच्या केवळ माध्यमापासून एक अशी गाडी आहे.

जिने एका पिढीशी अत्यंत निष्ठावान प्रवाशांशी आजही आपली बांधिलकी जपली आहे असे मध्य रेल्वेने म्हटले आहे.

कधी काळी लुना सोबत लावलेल्या स्पर्धेत पुणे ते मुंबई प्रवासादरम्यान 'दख्खनच्या राणी'लाही हार पत्करावी लागली होती असा किस्सा बोल भिडू या वेबसाइटवर प्रसिद्ध झालाय.