आषाढी अमावस्येला दीपपूजनाची प्राचीन परंपरा आहे.

अमावस्येच्या रात्री अग्नीविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दीपपूजन केलं जातं.

यावर्षी 16 जुलैला रात्री 10.06 मिनिटांनी अमावस्या सुरु होतेय आणि 17 जुलैला संपेल. मात्र दीप अमावस्या 17 तारखेला साजरी केली जाईल.

दीप अमावस्येची पूजा करण्याआधी दिवे स्वच्छ धुऊन, पुसून घ्यावे.

दिवे पाटावर मांडावेत.

पाटाभोवती रांगोळी काढून फुलांची आरास करावी.

दिव्यांमध्ये तेल आणि वात टाकून दिवे लावावेत.

कणकेचे गुळ घालून तयार केलेले उकडलेले दिवे नैवेद्य म्हणून ठेवावे.

कणकेच्या दिव्यामध्ये तुपाची वात ठेऊन तो देवापुढे ठेवा.