दीप अमावस्येला दिवे का लावतात, जाणून घ्या

Religion

12 August 2026

Author:  प्राजक्ता प्रधान

दीप अमावस्या कधी आहे

आषाढ अमावस्येला दीप अमावस्या असे म्हटले जाते. यंदा दीप अमावस्या बुधवार, 12 ऑगस्ट रोजी आहे

Picture Credit: Pinterest

कणकेचे दिवे बनवण्याची परंपरा ही अन्न, समृद्धी, कृतज्ञता आणि आरोग्याचे प्रतीक मानले जाते. या दिवशी घरातील सर्व दिव्यांची पूजा केली जाते आणि पितरांचे व सूक्ष्म जीवांचे स्मरण करून त्यांना अन्न व प्रकाशाचा भाग अर्पण केला जातो.

कणकेचे दिवे बनवण्याची परंपरा

Picture Credit: Pinterest

कणिक (गव्हाचे पीठ) हे अन्नपूर्णेचे रूप मानले जाते. पिठाचे दिवे बनवून ते प्रज्वलित करणे म्हणजे घरात अन्नाची कमतरता भासू नये अशी प्रार्थना करणे होय.

अन्न आणि समृद्धीचे प्रतीक

Picture Credit: Pinterest

या दिवशी कणकेचे गोड दिवे बनवून त्यात साजूक तूप घातले जाते. असा सात्विक नैवेद्य दाखवल्याने पितर आणि इतर सूक्ष्म जीव-जिवाणू तृप्त होतात अशी धार्मिक श्रद्धा आहे.

पितरांचे तृप्तिीकरण

Picture Credit: Pinterest

अनेक ठिकाणी कणकेच्या दिव्यांनी घरातील लहान मुलांना ओवाळले (औक्षण) जाते. यामुळे मुलांना दीर्घायुष्य लाभते, आरोग्य उत्तम राहते आणि वाईट दृष्ट लागण्यापासून रक्षण होते असे मानले जाते.

लहान मुलांचे औक्षण 

Picture Credit: Pinterest

नकारात्मकता दूर करणे

Picture Credit: Pinterest

दिव्याचा प्रकाश आणि कणकेची पवित्रता मिळून घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि सकारात्मकता, सुख-शांती नांदते.

दीप अमावस्येचे महत्त्व

Picture Credit: Pinterest

आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी येणाऱ्या आषाढ अमावस्येला 'दीप अमावस्या' किंवा 'दीपपूजन' म्हटले जाते.  हिंदू संस्कृतीतील अत्यंत सण-उत्सवांचा व व्रतवैकल्यांचा 'श्रावण' महिना सुरू होतो, ज्याचे स्वागत दिव्यांच्या प्रकाशाने केले जाते.