दीपिका पदुकोणच्या रोहित शेट्टीच्या आगामी सिनेमात दिसणार आहे. नुकतंच पोस्टर रिलीज झालं आहे.

रोहित शेट्टीने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर सिंघम अगेनचे नवीन पोस्टर रिलीज केले आहे.

हातात पिस्तूल, चेहऱ्यावरच्या जखमातून रक्त वाहत आहे, दीपिकाचा हा नवा लूक पाहून चाहते थक्क झाले आहेत.

पोलीस अधिकाऱ्याच्या युनिफॉर्ममध्ये दीपिका किलर स्माईल देताना दिसत आहे.  

दीपिकाने गुन्हेगाराचा गळा  पकडलाय. तिच्या तोंडात पिस्तूल आहे. मागच्या व्हॅनला आग लागलेली आहे.

दीपिकाची ही स्टाईल पाहून चाहते दीपिकाच्या लूकवर फिदा आहेत.

रोहितने पोस्टर रिलीज करून कॅप्शन दिले - स्त्री सीतेचे रूप आहे आणि दुर्गेचेही. पोलीस अधिकारी शक्ती शेट्टी, माय लेडी सिंघम. दीपिका पदुकोण.

या पोस्टरमुळे चाहत्यांची उत्कंठा वाढली आहे. "चाहते म्हणतायेत, प्रतीक्षा करू शकत नाही."

'सिंघम अगेन' 15 ऑगस्ट 2024 मध्ये रिलीज होणार आहे. अजय देवगण, रणवीर सिंह,करीना कपूर, अक्षय कुमार, टायगर श्रॉफ आहेत.