'जवान'च्या प्रेस कॉन्फरन्समध्ये दीपिकाच्या एलिगंट लूकची चर्चा
जवान चित्रपटात खरंतर दीपिकाचा खूप छोटा रोल आहे. मात्र या छोट्या भूमिकेतही तिने चाहत्यांची मनं जिंकली आहेत.
नुकतीच या चित्रपटासाठी प्रेस कॉन्फरन्स आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी शाहरुख खान आणि दीपिका पादुकोण दोघेही उपस्थित होते.
या प्रेस कॉन्फरन्समधल्या दीपिकाच्या लूकची खूप चर्चा झाली.
दीपिकाने या प्रेस कॉन्फरन्ससाठी पांढरी साडी नेसली होती.
शाहरुखसोबत तिने कार्यक्रमाची शान वाढवली.
तिचा हा एलिगंट लूक चाहत्यांना खूप आवडला आहे.
यावेळी दीपिका आणि शाहरुखने रॅम्प वॉकही केला.
हॉल्टर नेक बॅकलेस ब्लाऊज आणि व्हाइट साडी यामुळे दीपिका ग्लॅमरस दिसत होती.