पावसामुळे यमुना नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे दिल्लीमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे.

उत्तर भारतात अनेक ठिकाणी पुरामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे.

यमुनेच्या पाण्याच्या पातळीत सातत्याने वाढ होत असून नदीकिनाऱ्याच्या परिसरातील रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आलंय.

बुधवारी यमुनेची पाण्याची पातळी 207.55 मीटर नोंदविण्यात आली.

नदीच्या पाण्यात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

दिल्लीत गेल्या तीन दिवसांत यमुनेच्या पाण्याच्या पातळीत झपाट्याने वाढ झाली.

दिल्लीचे पाणीपुरवठामंत्री सौरभ भारद्वाज  म्हणाले की, दिल्ली सरकार परिस्थतीला तोंड देण्यासाठी तयार आहे.

 दिल्लीच्या इतर भागात पुराचे पाणी शिरू नये यासाठी सखल भागात बंधारे बांधले जात आहेत

जनजागृती, निर्वासन आणि बचाव कार्यासाठी 45 बोटी तैनात करण्यात आल्या आहेत.

पूरस्थिती वाढल्याने दिल्लीचे मुख्यमंत्री अरिवद केजरीवाल यांनी केंद्र सरकारकडे हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे.

फोटो सौजन्य -PTI