पावसामुळे यमुना नदीने धोक्याची पातळी ओलांडली होती. त्यामुळे दिल्लीमध्ये पूरस्थिती निर्माण झाली होती.
उत्तर भारतात अनेक ठिकाणी पुरामुळे जनजीवन विस्कळीत झालं.
मात्र आता यमुनेचं पाणी ओसरायला सुरुवात झाली आहे.
पुरानंतरच्या स्थितीचे काही फोटो सध्या व्हायरल झाले आहेत.
यमुना नदीचं पाणी ओसरायला लागल्यापासून परिस्थिती हळुहळू सुरळीत होतेय.
मात्र आजही हवामान विभागाने दिल्लीसाठी यलो अलर्ट दिला आहे.
त्यामुळे अजुनही धोका टळलेला नाही.
दिल्लीच्या इतर भागात पुराचे पाणी शिरू नये यासाठी सखल भागात बंधारे बांधले जात आहेत.
गेल्या 40 वर्षातला रेकॉर्ड यमुना नदीने मोडला आहे. कारण नदीत सोडल्या जाणाऱ्या घाणीमुळे तिच्या पात्राची खोली कमी होतेय.
प्रशासनाने वेळीच काही पावलं उचलली नाही तर दिल्लीत यमुना नदीच्या पुराची समस्या पुन्हा डोकं वर काढू शकते.