Dev Anand 100th Birth Anniversary- देव आनंद यांना काळा कोट घालण्यावर खरंच होती बंदी ?

अभिनेते देव आनंद आज हयात नाहीत. पण त्यांचे चित्रपट लोक आजही आवडीने बघतात.

देव आनंद यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने आज आपण त्यांच्या काळ्या कोटाचं रहस्य जाणून घेणार आहोत.

देव आनंद यांच्याबद्दल अनेक किस्से सांगितले जातात. त्यात त्यांच्या काळ्या कोटाचा किस्सा  आवर्जून सांगितला जातो.

देव आनंद यांचा व्हाइट शर्ट आणि ब्लॅक कोट हा लूक खूप लोकप्रिय होता. तरुण मुली त्यांच्या या लूकवर फिदा होत्या.

काही मुलींनी देव आनंद यांना काळ्या कोटमध्ये बघून आत्महत्या केल्याची अफवा पसरली होती.

त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी त्यांनी काळा कोट घालण्यावर कोर्टाने बंदी घातल्याची अफवा पसरली.

देव आनंद यांनी  त्यांच्या ‘रोमान्सिंग विद लाइफ’ या आत्मचरित्रामध्ये  काळ्या कोटावरील बंदीची बाब अफवा असल्याचं स्पष्ट केलं.

अशा अफवांमध्ये काही तथ्य नसतं, असंही त्यांनी 2007 साली प्रसिद्ध झालेल्या आपल्या आत्मचरित्रामध्ये लिहिलं आहे.