पाटण्याच्या बैठकीवरुन फडणवीसांना कुटुंब वाचविण्यासाठी, कुटुंबात सत्ता राहण्यासाठी बैठक असल्याची टिका ठाकरेंवर केली होती

फडणवीसांच्या कुटुंबावरील टिकेनंतर ठाकरे-फडणवीस यांच्यात वाकयुद्ध सुरु झाले आहे

आमच्या कुटुंबावर जाऊ नका, अन्यथा आम्ही सुद्धा तुमचे व्हॉटसअप चॅट उघड करु, असा इशारा ठाकरेंनी फडणवीसांना दिलाय

ठाकरेंच्या टिकेला प्रतिउत्तर देताना फडणवीसांनी म्हटलंय की, आमचं सगळं खुली किताब आहे, तुम्हाला जे काही उघडं करायचे ते जरुर करा, असं आव्हान दिलं आहे

मी कुणाच्या भानगडीत पडत नाही, आणि पडलो तर त्यांला धडा शिकवल्याशिवाय राहत नाही

माझ्या नादी लागू नका, असा इशारा देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना दिला आहे

दरम्यान, फडणवीसांच्या या टिकेला ठाकरे गटाकडून काय उत्तर येतंय हे पाहवे लागेल