डायबिटीज रुग्णांच्या रक्तातील साखरेची पातळी अनेकदा खाल्ल्यानंतर झपाट्याने वाढते.
डायबिटीज रुग्णांनी शरीरातील ग्लुकोजची पातळी वाढवणाऱ्या पदार्थांचे सेवन करू नये.
तुम्ही योग्य क्रमाने जेवल्यास रक्तातील साखरेची पातळी झपाट्याने कमी होऊ शकते.
जाणून घ्या काय आहे जेवणाचा योग्य क्रम
जेवताना, आधी भाज्या, मग प्रोटीन आणि फॅट्स, नंतर स्टार्च आणि साखर असं खावं.
तुम्ही घरी असाल तर आधी भाज्या, मग चिकन, मासे किंवा अंडी, मग भात आणि शेवटी काहीतरी गोड खावे.
तुम्ही हॉटेलमध्ये असाल तर जेवणापूर्वी कंप्लिमेंटरी ब्रेड खाऊ नका. रिकाम्या पोटी खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी झपाट्याने वाढते.
गोड चहा किंवा ज्यूस सारख्या साखरयुक्त पेयांचे सेवन केल्याने तुमच्या रक्तातील साखरेच्या पातळीवर वाईट परिणाम होतो.