हल्लीच्या काळात घरात एखादा तरी डायबेटीसचा रुग्ण असतोच असतो. 

या रुग्णांसाठी रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करणं हे खूप मोठं आव्हान आहे. 

मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी तुम्ही खाण्यासोबतच हेल्दी ड्रिंक्स घेणंही गरजेचं आहे. 

रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी आम्ही तुम्हाला अशीच काही हेल्दी ड्रिंक्स सांगणार आहोत. 

 ग्रीन टी तुमच्या शरीरासाठी अतिशय उपयुक्त आहे.

काही अभ्यासानुसार, कॉफी प्यायल्याने टाइप 2 मधुमेह होण्याचा धोका कमी होतो.

वर्कआउटनंतर, डायबिटीसच्या रुग्णांनी नारळ पाणी पिणे हा इलेक्ट्रोलाइट संतुलन निर्माण करण्याचा एक चांगला मार्ग असू शकतो.

भाज्यांचा रस किंवा स्मूदी बनवणे हा सुद्धा एक चांगला आणि आरोग्यदायी पर्याय आहे.