‘व्हिटॅमिन डी’ शरीरासाठी आवश्यक पोषक तत्व आहे. पावसाळ्यात ढगाळ वातावरणामुळे सुर्यप्रकाशातून ‘व्हिटॅमिन डी’ मिळत नाही.
पावसाळ्यात व्हिटॅमिन डीची कमतरता दूर करण्यासाठी आहारात तुम्ही काही बदल करणं आवश्यक आहे.
शरीरातील ‘व्हिटॅमिन डी’ची कमतरता भरून काढण्यासाठी फॅटी फिश किंवा फिश ऑइलचा आहारात समावेश करा.
काही पदार्थांमध्ये ‘व्हिटॅमिन डी’चं प्रमाण कमी असतं पण पावसाळ्यात त्याचा उपयोग होतो.
अंड्याचा पिवळा भाग, मशरूम आणि पनीर खा.
काही जण ‘व्हिटॅमिन डी’ वाढवण्यासाठी औषधंदेखील घेतात.
तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने सप्लिमेंट्स खाऊ शकता.
रक्त तपासणी करून ‘व्हिटॅमिन डी’ची गरज आहे की नाही हे आधी बघा. त्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं तर गोळ्या घ्या.
जास्त प्रमाणात व्हिटॅमिन डी घेणं आरोग्यासाठी हानिकारक ठरु शकतं, हे लक्षात ठेवा.