यामागे आहे Projection Mapping Technology! या तंत्रज्ञानात विशेष प्रोजेक्टरच्या मदतीने एखाद्या मोठ्या वास्तूवर किंवा पृष्ठभागावर चित्रे, व्हिडिओ आणि संदेश दाखवले जातात.
Picture Credit:pinterest
यासाठी शक्तिशाली प्रोजेक्टर वापरले जातात. त्यातून बाहेर पडणारा प्रकाश पुलाच्या ठरावीक भागावर टाकला जातो. त्यामुळे रात्री अंधारात चित्रे अधिक स्पष्ट दिसतात.
Picture Credit:pinterest
सर्वप्रथम जाहिरातीचा लोगो, पोस्टर किंवा व्हिडिओ डिजिटल स्वरूपात तयार केला जातो. त्यानंतर पुलाच्या रचनेनुसार त्याचे मॅपिंग केले जाते, जेणेकरून चित्र योग्य जागी दिसेल.
Picture Credit:pinterest
पुलाचे खांब, केबल्स आणि आकार लक्षात घेऊन प्रोजेक्टरचा अँगल सेट केला जातो. डिजिटल मॅपिंगमुळे चित्र योग्य भागावर दाखवता येते.
Picture Credit:pinterest
या तंत्रज्ञानातून स्थिर पोस्टरसोबतच अॅनिमेशन, रंग बदलणारे इफेक्ट्स आणि हलणारे संदेशही दाखवता येतात.
Picture Credit:pinterest
WhatsApp आणि JLL सारख्या ब्रँड्सनी सी लिंकचा वापर अशा खास प्रोजेक्शन कॅम्पेनसाठी केला आहे. त्यामुळे संपूर्ण पूल जाहिरातीच्या मोठ्या डिजिटल स्क्रीनसारखा दिसतो.
Picture Credit:pinterest
LED लाइट्स पुलाला रंगीत प्रकाश देतात, तर Projection Mapping च्या मदतीने त्यावर ठरावीक चित्र, लोगो किंवा संदेश दाखवता येतो. दोन्ही तंत्रज्ञानांचा उद्देश वेगळा आहे.
Picture Credit:pinterest
मोठे प्रोजेक्टर, डिजिटल डिझाइन आणि अचूक मॅपिंग यांच्या मदतीने सी लिंकचे रूपच बदलते. त्यामुळे मुंबईची ही वास्तू जाहिरातींसाठीही आकर्षक डिजिटल कॅनव्हास बनते!
Picture Credit:pinterest