दुधासोबत दही खाल्ल्याने काय होते, जाणून घ्या

Life style

09 October, 2025

Author:  प्राजक्ता प्रधान

दूध आणि दही दोन्ही आरोग्यासाठी फायदेशीर आहे. मात्र ते एकत्र खाण्याचे काही तोटे देखील आहेत. दुधासोबत दही खाण्याचे तोटे जाणून घ्या

दुधासोबत दही खाण्याचे तोटे

दूध आणि दही दोन्ही पचायला जड असतात. हे दोन्ही एकत्र खाल्ल्याने पचनाच्या समस्या उद्भवू शकतात. जसे की गॅस, अॅसिडीटी

पचनाची समस्या

पोषक तत्वांची कमतरता

दूध आणि दह्यांमधील प्रथिने आणि कॅल्शिअम एकमेंकामधील शोषण कमी करते. यामुळे शरीराला आवश्यक पोषक तत्व मिळत नाही

अॅलर्जीची समस्या

काही लोकांना दूध आणि दह्याची अॅलर्जी होऊ शकते. हे दोन्ही एकत्र खाल्ल्याने अॅलर्जी वाढू शकते.

वजन वाढणे

दूध आणि दही दोन्हीमध्ये कॅलरीज जास्त असतात. हे एकत्र खाल्ल्यास वजन वाढू शकते. जास्त प्रमाणात खावू नये

सर्दी खोकल्यांच्या समस्या

दूध आणि दही दोन्ही एकत्र खाल्ल्यास सर्दी खोकल्यांच्या समस्या वाढू शकतात. यामुळे कफ वाढू शकतो आणि घसा खवखवू शकतो

त्वचेची समस्या

दूध आणि दही एकत्र खाल्ल्यास त्वचेची समस्या उद्भवू शकते. जसे की पुरळ आणि एक्झिमा

आतड्यांसंबंधी समस्या

दूध आणि दही एकत्र खाल्ल्यास आतड्यांसंबंधी समस्या उद्भवू शकते. जसे की आतड्यांना सूज येणे आणि दुखणे