अंबानींच्या घरी गणपती सेलिब्रेशनसाठी गेलेली दिशा पटानी का झाली ट्रोल ?
दिशा पटानी नेहमी अनेक पार्टीजमध्ये हजेरी लावत असते.
मुकेश अंबानींच्या घरीही गणपती सेलिब्रेशनसाठी दिशा मौनी रॉयसोबत आली होती.
या सेलिब्रेशनसाठी आलेल्या दिशाला नेटकऱ्यांनी चांगलंच ट्रोल केलं.
दिशाला ट्रोल करण्याचं कारण होते तिचे कपडे.
दिशाने अंबानींच्या घरी गणपती सेलिब्रेशनसाठी येताना सिल्क साडीसोबत ब्रालेट ब्लाऊज घातला होता.
मात्र गणेशोत्सवासाठी दिशाचं असं अंगप्रदर्शन करणारे कपडे घालणं, लोकांना आवडलं नाही.
‘गणपतीच्या दर्शनाला जाताना असे कपडे कोण परिधान करतं?’, असा प्रश्न नेटकऱ्यांनी विचारला आहे.
आता दिशा या सगळ्यावर काय प्रतिक्रिया देतेय ते पाहावं लागेल.