दिवाळीतील प्रत्येक दिवसांचे महत्त्व जाणून घ्या

Lifestyle

30 October 2026

Author:  प्राजक्ता प्रधान

दिवाळीची सुरुवात ५ नोव्हेंबर रोजी वसुबारसपासून होत आहे आणि ११ नोव्हेंबर रोजी भाऊबीज आहे.

दिवाळीची सुरुवात कधी होत आहे

Picture Credit: Pinterest

वसुबारस (गोवत्स द्वादशी) हा महाराष्ट्रात आणि इतर काही भारतीय राज्यांमध्ये दिवाळीच्या सणाची सुरुवात करणारा पहिला सण आहे

वसुबारस

Picture Credit: Pinterest

धनत्रयोदशी

दिवाळीची सुरुवात धनत्रयोदशीने होते. या दिवशी भगवान धन्वंतरी, देवी लक्ष्मी आणि कुबेर यांची पूजा केली जाते. सोने, चांदी, भांडी किंवा नवीन वस्तू खरेदी करणे शुभ मानले जाते.

Picture Credit: Pinterest

नरक चतुर्दशी

Picture Credit: Pinterest

या दिवशी पहाटे अभ्यंगस्नान करण्याची परंपरा आहे. भगवान श्रीकृष्णांनी नरकासुराचा वध करून लोकांना भयमुक्त केले, अशी पौराणिक कथा सांगितली जाते.

लक्ष्मीपूजन

Picture Credit: Pinterest

दिवाळीतील हा मुख्य दिवस मानला जातो. संध्याकाळी देवी लक्ष्मी आणि भगवान गणेशाची पूजा केली जाते. घरात सुख, समृद्धी आणि भरभराट नांदावी, यासाठी प्रार्थना केली जाते.

गोवर्धन पूजा / बलिप्रतिपदा

Picture Credit: Pinterest

या दिवशी काही परंपरांमध्ये गोवर्धन पूजा आणि अन्नकूट उत्सव साजरा केला जातो. महाराष्ट्रात बलिप्रतिपदेला दिवाळी पाडवा म्हणून महत्त्व आहे. पती-पत्नीच्या नात्यातील प्रेम आणि विश्वासाचा हा दिवस मानला जातो.

भाऊबीज

Picture Credit: Pinterest

दिवाळीचा शेवट भाऊबीजेने होतो. या दिवशी बहीण भावाला ओवाळते आणि त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. भाऊ बहिणीला प्रेमाने भेटवस्तू देतो.