आंब्यासह कोणत्या गोष्टी खाऊ नयेत, जाणून घ्या 

Lifestyle

08April 2026

Author:  प्राजक्ता प्रधान

आंब्याचा हंगाम

फळांचा राजा असलेल्या आंब्याचा हंगाम सुरू होताच, प्रत्येक घरात त्याची मागणी वाढते. चव, सुगंध आणि गोडव्याने परिपूर्ण असलेला आंबा हे असे फळ आहे, जे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडते.

Picture Credit: Pinterest

 उन्हाळ्यात केवळ तो चवीचा आनंदच देत नाही तर तो शरीराला ऊर्जाही देतो, यामुळे आंबा हे लोकांच्या आवडीचे फळं आहे. 

आवडीच फळ

Picture Credit: Pinterest

आंबा हे विटॅमिन सी आणि विटॅमिन ए ने समृद्ध असलेले फळ आहे, जे रोगप्रतिकारशक्ती मजबूत करते आणि संसर्ग टाळण्यास मदत करते. 

संसर्ग टाळण्यास मदत

Picture Credit: Pinterest

आंब्यामध्ये फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, जे कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यास आणि हृदय निरोगी ठेवण्यास उपयुक्त ठरतात.

आंब्यामधील पोषक तत्व 

Picture Credit: Pinterest

आंबट फळांसह आंबा खाऊ नये

आयुर्वेदानुसार, प्रत्येक फळ पचायला वेगवेगळा वेळ लागतो, त्यामुळे ती एकत्र खाल्ल्याने गॅस, आम्लपित्त आणि अपचन होऊ शकते. विशेषतः संत्री, लिंबू, केळे यांसारख्या फळांसह आंबा खाणे टाळावे. 

Picture Credit: Pinterest

आयुर्वेदानुसार, दूध किंवा दही, आईस्क्रीम आणि मिल्कशेक यांसारख्या दुग्धजन्य पदार्थांसह आंबा खाणे आरोग्यासाठी योग्य नाही; यामुळे पचनक्रिया कमजोर होऊन गॅस, अपचन किंवा शरीरात विषारी द्रव्ये तयार होऊ शकतात.

दूध आणि दुग्धजन्य पदार्थ

Picture Credit: Pinterest

आंबे खाण्यापूर्वी किंवा खाल्ल्यानंतर लगेच आंबट किंवा मसालेदार पदार्थ खाल्ल्याने पोटातील पित्त वाढू शकते; यामुळे आम्लपित्त, छातीत जळजळ, गॅस आणि कधीकधी त्वचेची अॅलर्जी किंवा मुरुमेदेखील होऊ शकतात. 

आंबट आणि मसालेदार पदार्थ

Picture Credit: Pinterest

आंबा खाल्ल्यानंतर लगेच पाणी, चहा किंवा कॉफी प्यायल्याने पचनक्रियेवर परिणाम होऊ शकतो. यामुळे गॅस, पोटदुखी किंवा उलट्या यांसारख्या पोटाच्या समस्या उद्भवू शकतात.

पाणी, चहा किंवा कॉफी 

Picture Credit: Pinterest

कारले 

Picture Credit: Pinterest

जर तुम्ही कारले खाल्ले असेल तर त्यानंतर लगेच आंबा खाणे टाळा. या दोन्हीच्या संयोगामुळे पोटदुखी, मळमळ किंवा उलट्या होऊ शकतात.