रविवारी नॉनव्हेजसह हे 5 पदार्थ खाणार असाल तर व्हा सावध, अन्यथा...
रविवारी सूर्याची पूजा करण्याची परंपरा आहे. रविवार हा भगवान सूर्याचा दिवस असल्याचे मानले जाते.
रविवारी उपवास करणाऱ्यांनी तर काही नियम पाळायलाच हवेत तसेच काही गोष्टी रविवारी चुकूनही खाऊ नयेत. जाणून घेऊया रविवारी कोणत्या 5 गोष्टींचे सेवन करू नये.
वास्तविक, शास्त्रानुसार रविवारी मीठ खाऊ नये. या दिवशी मिठाचे सेवन केल्याने आरोग्यावर वाईट परिणाम होतो आणि तुमच्या सर्व कामात अडथळे येतात.
विशेषत: रविवारी संध्याकाळी मीठ सेवन करणे चांगले मानले जात नाही.
शास्त्रानुसार रविवारी खिचडी खाणे चांगले मानले जात नाही. विशेषतः काळ्या उडीद डाळीची खिचडी रविवारी चुकूनही खाऊ नये. याचे कारण म्हणजे हे शनिशी संबंधित अन्न आहे
ज्योतिष शास्त्रानुसार रविवारी शनिशी संबंधित पदार्थांचे सेवन करणे पूर्णपणे निषिद्ध मानले जाते.
यासोबतच रविवारच्या दिवशी तेलाचे सेवन करू नये, शिवाय तेलाने बॉडी मसाजही करू नये. रविवारी तेलाने मसाज केल्यास सूर्यही कमजोर होतो.
रविवारी चुकूनही मांस आणि अल्कोहोलचे सेवन करू नये. वास्तविक या दिवशी मांस आणि मद्य सेवन केल्याने त्वचेशी संबंधित आजार होऊ शकतात.
ज्योतिष शास्त्रानुसार रविवारी आल्याचे सेवन करणे देखील अशुभ मानले जाते.
या दिवशी आल्याचे सेवन
केल्याने जीवनात दारिद्र्य आणि आर्थिक संकट येते.
म्हणूनच रविवारी शक्यतो या गोष्टींचे सेवन करू नये, असे मानले जाते.
Disclaimer : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. नवराष्ट्र त्याची हमी देत नाही