वास्तुशास्त्राच्या नियमांचं पालन केल्यास घरात सुख-समृद्धी राहते.
बेडरुमशी संबंधित काही नियम आहेत. दिवाणाच्या खाली किंवा आतमध्ये या गोष्टी ठेवणं टाळावे.
या गोष्टी दिवाणात ठेवल्यास वास्तुदोष निर्माण होतात आणि समृद्धी नष्ट होते असं म्हणतात.
अनेकजण सुरक्षित म्हणून पैसे दिवाणात ठेवतात. वास्तुशास्त्राच्या दृष्टिकोनातून हे चुकीचे आहे.
पैशाचा संबंध लक्ष्मीशी आहे. त्यामुळे पलंगाखाली, दिवाणात पैसे ठेवल्याने देवीचा अनादर होतो.
घरातील जागा अपुरी असल्याने बरेच लोक दिवाणाच्या आत भांडी ठेवतात.
भांडी शनिदेवाशी संबंधित असल्यामुळे ते अशुभ आहे.
चोरांपासून वाचण्यासाठी बरेच लोक आपले दागिने दिवाणात बॉक्समध्ये ठेवतात.
सोन्याचे दागिने विष्णूशी संबंधित मानले जातात. यामुळे विष्णू देवाची नाराजी पत्करावी लागते.