आपण प्रवासाला जाताना आपला फोन पूर्ण चार्ज करून घराबाहेर पडतो. पण फोनच्या वापरामुळे बॅटरी लवकर संपते.
प्रवासादरम्यान फोटो, व्हिडीओ काढण्यासाठी आणि गाणी ऐकण्यासाठी फोनचा जास्त वापर केला जातो. यामुळे फोनची बॅटरी लवकर संपते.
तसेच प्रवासादरम्यान काही वेळा नेटवर्क समस्या निर्माण होते. त्यामुळे फोनमध्ये नेटवर्क शोधताना देखील फोनची बॅटरी लवकर संपते.
प्रवासादरम्यान फोनची बॅटरी संपली आणि फोन बंद झाला की आपण फोटो आणि व्हिडीओ काढू शकत नाही.
पण आता आम्ही तुम्हाला काही अशा टीप्स सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्ही तुमचा फोन संपूर्ण प्रवासादरम्यान वापरू शकता.
तुम्हाला केवळ तुमच्या फोनमधील super power saving mode ऑन करायचा आहे, ज्यामुळे तुम्ही प्रवासादरम्यान तुमच्या फोनचा अगदी बिंधास्त वापर करू शकता.
super power saving mode ऑन करण्यासाठी सर्वात आधी तुमच्या फोनधील सेटिंग्ज ओपन करा आणि बॅटरी ऑप्शनवर क्लिक करा.
बॅटरी ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला super power saving mode चा पर्याय दिसेल त्यावर टॅप करा.
super power saving mode मुळे तुम्ही तुमचा फोन संपूर्ण प्रवासादरम्यान वापरू शकता.