नागपंचमीला चुकूनही करू नका ‘या’ गोष्टी

यंदा नागपंचमी 21 ऑगस्टला साजरी केली जाणार आहे.

यंदा नागपंचमी पूजेचा शुभ मुहूर्त 21 ऑगस्टला पहाटे 5 वाजून 53 मिनिटांपासून ते सकाळी 8 वाजून 30 मिनिटांपर्यंत असेल. नागपंचमी तिथीची समाप्ती - 22 ऑगस्टला दुपारी 2:00 वाजता होईल.

नागपंचमीच्या दिवशी काही नियम पाळले जातात. नागपंचमीला कोणत्या गोष्टी करू नयेत हे जाणून घेऊयात.

नागपंचमीच्या दिवशी सापांना कुठल्याही प्रकारचा त्रास देऊ नका. त्यांची पूजा करून त्यांच्या रक्षणाची शपथ घ्या.

नागपंचमीच्या दिवशी तवा आणि लोखंडी कढई वापरली जात नाही. असे केल्याने सर्पदेवतेला त्रास होतो असं मानलं जातं. याशिवाय सुई, चाकू अशा कोणत्याही तीक्ष्ण आणि धारदार वस्तूंचा वापर या दिवशी करु नये असंही सांगितलं जातं.

या दिवशी जमीन खणू नये. कारण असं केल्याने सापाला किंवा सापाच्या बिळाला त्रास होतो.

शिवलिंगाला किंवा नागदेवाला तांब्याच्या भांड्यात दूध अर्पण करू नये.पाण्यासाठी तांब्याचे भांडे आणि दुधासाठी पितळेचे भांडे वापरावे.

या दिवशी जिवंत सापाला दूध देऊ नका. दूध सापांसाठी विषासारखं आहे. सापाच्या मूर्तीवरच दूध अर्पण करा.