चहा बनवताना ‘या’ चुका ठरतील आरोग्यासाठी घातक
आपल्या देशात चहा हे पाण्यानंतर दुसरे सर्वाधिक सेवन केले जाणारे पेय आहे.
मात्र चुकीच्या पद्धतीने बनवलेला चहा आरोग्यासाठी घातक ठरू शकतो.
काही लोक आधी दूध उकळतात आणि ते पूर्णपणे उकळल्यावर त्यात पाणी, साखर आणि चहाची पाने मिसळतात, ही पद्धत चुकीची आहे.
कडक चहा हवा म्हणून काही जण चहा जास्त प्रमाणात उकळतात. हे आरोग्यासाठी हानिकारक आहे.
चहा जास्त वेळ उकळल्यामुळे ॲसिडीटीचा त्रास होऊ शकतो.
जास्त साखर असलेला चहा प्यायल्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढते, ज्यामुळे भविष्यात लठ्ठपणा आणि मधुमेह होण्याची शक्यता असते.
पोटाच्या समस्या उद्भवू नये म्हणून चहा कमी प्रमाणात प्या.
कमी प्रमाणात चहा प्यायलात तरच तो आरोग्यासाठी फायदेशीर ठरतो.