Published Jan 10, 2025
By Harshada Patole
Pic Credit- Social Media
हिवाळ्यात मॉर्निंग वॉकला जाणे ही चांगली सवय आहे, थंडीत मॉर्निंग वॉकला जाताना करू नका 'या' चुका.
थंडीच्या दिवसात सकाळी फिरायला जाणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते. यामुळे तुम्ही दिवसभर सक्रिय राहता.
आपण अनेकदा सकाळी झोपेतून उठल्याबरोबर थंड पाणी पितो. ही सवय आपल्या आरोग्यासाठी चांगली नाही.
मॉर्निंग वॉकला जाण्यापूर्वी कोमट पाणी पिणे अधिक फायदेशीर आहे.
मॉर्निंग वॉक करण्यापूर्वी चहा किंवा कॉफी प्यायल्याने शरीरावर आणि हृदयावर विपरीत परिणाम होतो.
डोके ओले करून फिरायला गेल्याने खोकला, सर्दी आणि मेंदूच्या नसांवर ताण येऊ शकतो.
जेव्हा तुम्ही मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर जाल तेव्हा तुमचे शरीर उबदार कपड्यांनी झाका.
.
तसेच शूज, हातमोजे आणि टोपी घालूनच मॉर्निंग वॉकसाठी जा.
.
शक्य असल्यास, चालणे सुरू करण्यापूर्वी हलका वॉर्म-अप किंवा व्यायाम करा, यामुळे आजूबाजूच्या वातावरणातबरोबर समतोल राखता येतो.
.
४५ मिनिटांसाठी मॉर्निंग वॉक करा आणि नंतर घरी आल्यावर शरीराला विश्रांती द्या आणि पौष्टिक नाश्ता करा.
.