केस गळतायत? Hair Wash करताना तुम्ही तर करत नाही ना या चुका?

Lifestyle

02 September 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

खूप गरम पाणी

खूप गरम पाणी टाळू आणि केसांमधील नैसर्गिक तेल कमी करू शकते. त्यामुळे केस कोरडे व कमजोर होण्याची शक्यता असते.

Picture Credit: Pinterest

Shampoo जास्त वापरणे

गरजेपेक्षा जास्त Shampoo वापरल्याने केस आणि Scalp कोरडे होऊ शकतात. योग्य प्रमाणातच Shampoo वापरा.

Picture Credit: Pinterest

नखांनी Scalp घासणे

Shampoo करताना नखांऐवजी बोटांच्या टोकांनी हलक्या हाताने Scalp मसाज करा. जोरात घासल्याने त्वचेला त्रास होऊ शकतो.

Picture Credit: Pinterest

रोज Shampoo?

प्रत्येकाच्या केसांचा प्रकार आणि Scalp वेगळा असतो. केस किती तेलकट किंवा घाण झाले आहेत, त्यानुसार Hair-Wash Routine ठरवा.

Picture Credit: Pinterest

ओल्या केसांना जोरात पुसणे

ओले केस तुलनेने नाजूक असतात. टॉवेलने जोरात रगडण्याऐवजी हलक्या हाताने पाणी शोषून घ्या.

Picture Credit: Pinterest

Conditioner चुकीच्या ठिकाणी

सामान्यतः Conditioner केसांच्या लांबीवर आणि टोकांवर लावणे योग्य ठरते. उत्पादनाच्या सूचनांनुसार वापर करा.

Picture Credit: Pinterest

ओले केस जोरात विंचरणे

ओल्या केसांवर ताण दिल्यास केस तुटण्याची शक्यता वाढू शकते. रुंद दातांचा Comb वापरून सावकाश केस सोडवा.

Picture Credit: Pinterest

Hair Washची पद्धतही महत्त्वाची!

गरम पाणी, जोरात घासणे, जास्त Shampoo आणि ओल्या केसांवर ताण देणे टाळा. केस गळणे अचानक किंवा मोठ्या प्रमाणात वाढले असल्यास Dermatologistचा सल्ला घ्या.

Picture Credit: Pinterest