कोलकात्त्यातील रबिन्द्र सरोबर मेट्रो स्टेशन 'पॅराडाईज ऑफ सुसाईड' या नावाने ओळखले जाते. इथे रात्री आत्म्याचे राज चालते असे स्थानिकांचे आणि प्रवाशांचे म्हणणे आहे.
आंध्रप्रदेशच्या चित्तूर रेल्वे स्थानकावर एका CRPF जवानांची हत्या केली गेली होती. तेव्हापासून तेथे रात्री-बेरात्री चित्र विचित्र गोष्टी घडतात.
मुंबईच्या मुलुंड स्टेशनवर रात्री-बेरात्री ओरडण्याचे तसेच रडण्याचे आवाज येत असतात.
उत्तरप्रदेशमधील नैनी स्थानकावर मध्यरात्री रडण्या-ओरडण्याचे आवाज येतात. स्थानिकांचे म्हणण्यानुसार, नैनी जेलमध्ये अनेक भारतीयांना इंग्रजांनी मारून टाकले होते. त्यांची आत्मा अजून भटकते.
शिमलाची सुंदर सफर करताना या रेल्वे स्टेशनशी गाठ पडते. या रेल्वे स्टेशनवर भल्याभल्यांना थरथरी भरते. तेथील लोकांचे म्हणणे आहे कि आजही कर्नल बडोगची आत्मा तेथील भोगद्यात वास करते.
बेगूनकोदार रेल्वे स्टेशन भारताच्या पश्चिम बंगाल राज्यात स्थित आहे. गेल्या ४२ वर्षांपासून स्टेशन पूर्णपणे बंद आहे. अनेकांना येथे मध्यरात्री एक मुलगी ट्रेनच्या मागे धावताना दिसली आहे.
हि माहिती इंटरनेटवरून मिळालेल्या माहितीवर आधारित असून नवराष्ट्र याची पुष्टी करत नाही.