स्वप्नशास्त्रानुसार काही स्वप्न ही शुभ असतात तर काही अशुभ. यांच्याशी खूप काही संबंध जुळलेला आहे.
काही स्वप्ने काही विशिष्ट अन्नपदार्थांशी संबंधित असतात. स्वप्नात कोणत्या गोष्टी खाणे शुभ आहेत जाणून घ्या
स्वप्नात स्वतःला आवळा खाताना पाहणे शुभ मानले जाते. याचा अर्थ असा आहे की, संपत्तीशी संबंधित आपल्या इच्छा लवकरच पूर्ण होणार आहेत.
स्वप्नात स्वतःला आले खाताना पाहण्याचा अर्थ असा होतो की, सुख समृद्धीमध्ये वाढ होणे. आल्याला सुख समृद्धीचे प्रतीक मानले जाते.
स्वप्नात स्वतःला आईस्क्रीम खाताना पाहणे शुभ मानले जाते. तुमचे जीवन आनंदी आणि शांत राहील आणि तुमचे सर्व काम पूर्ण होईल.
स्वप्नात स्वतःला अक्रोड खाताना पाहणे शुभ मानले जाते. कारण जीवनात आनंद लवकरच येत आहे. एखाद्या मुलाचे हास्य घरभर घुमू शकते.
स्वप्नात स्वतःला बडीशेप खाताना पाहणे शुभ आहे. याचा अर्थ आरोग्याशी संबंधित आहे. तसेच लवकरच धनलाभ होऊ शकतो.
स्वप्नामध्ये आंबा खाताना पाहणे शुभ असते. याचा संबंध धन आणि मुलांशी संबंधित आहे.
एखाद्या महिलेला स्वप्नामध्ये चिंच खाताना दिसणे शुभ मानले जाते. याचा संबंध सोने चांदीशी संबंधित आहे.