साखर आणि केळे मॅश करून त्याचा स्क्रब चेहऱ्यावर लावू शकता.

ओट्स आणि बदामाच्या तेलाची पेस्ट करून स्क्रब वापरा.

कॉफीमध्ये ग्लिसरीन मिसळून ते मिश्रण चेहऱ्यावर 10 मिनिटे लावा.

कोरफड जेल, साखर, ऑलिव्ह ऑईलचं मिश्रण करून मसाज करा.

पपईच्या पेस्टमध्ये साखर, मध मिसळा, ही पेस्ट चेहऱ्यावर 10 मिनिटे ठेवा.

दूध, हळद आणि साखरने तयार केलेला स्क्रब लावा, नंतर कोमट पाण्याने धुवा.

बेसनात साखर, कोरफड मिसळून पेस्ट करा. 15 मिनिटे स्क्रबिंग करा.

तांदूळाचं पीठ, मुलतानी माती, गुलाबपाणी एकत्र करून पेस्ट चेहऱ्यावर लावा.

एवोकॅडो पेस्ट, कॉफी, ऑलिव्ह ऑईलचे थेंब, या पेस्टने चेहरा स्क्रब करा.