Ducatiने Desmo450 MXवर आधारित नवीन Desmo450 SM सादर केली आहे. ही खास रेसिंगसाठी तयार केलेली Supermoto आहे.
Picture Credit:ducati
Desmo450 SM ही सामान्य रोड बाइक नाही. ती competition-spec supermoto असून ट्रॅकवरील कामगिरी लक्षात घेऊन विकसित करण्यात आली आहे.
Picture Credit:ducati
बाइकमध्ये 449.6cc single-cylinder Desmodromic इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 9,400 rpm वर 63.5 PS आणि 7,500 rpm वर 53.5 Nm टॉर्क देते.
Picture Credit:ducati
या बाइकचे वजन फक्त 109 kg आहे. इतक्या कमी वजनासोबत मिळणारी 63.5 PS पॉवर तिच्या performance-focused characterची कल्पना देते.
Picture Credit:ducati
Ducatiने चेसिसमध्येही मोठे बदल केले आहेत. Fully adjustable Showa suspensionसोबत 16.5-इंच फ्रंट आणि 17-इंच रिअर चाके मिळतात. त्यावर Metzeler Racetec Slick SM टायर्स आहेत.
Picture Credit:ducati
समोर 310 mm Galfer डिस्क आणि Brembo Stylema radial caliper देण्यात आला आहे. मागे 240 mm डिस्कसह Brembo caliper मिळतो.
Picture Credit:ducati
Desmo450 SMमध्ये 2 Riding Modes, Launch Control, Engine Brake Control आणि 4-level Traction Control आहे. गरजेनुसार Traction Control पूर्णपणे बंदही करता येतो.
Picture Credit:ducati
सध्या Ducatiने भारतात Desmo450 SM लॉन्च करण्याची अधिकृत घोषणा केलेली नाही. मात्र कंपनीची Desmo450 MX आधीच भारतात उपलब्ध आहे. त्यामुळे या Supermotoच्या भारतातील एंट्रीकडे लक्ष लागले आहे.
Picture Credit:ducati
भारतामध्ये Supermoto सेगमेंट फार मोठा नाही. Desmo450 SM आली तर Ducatiच्या पोर्टफोलिओमध्ये एक वेगळाच पर्याय तयार होईल. आंतरराष्ट्रीय बाजारात KTM 450 SMR ही तिच्या जवळची competition-spec rival आहे.
Picture Credit:ducati