पावसाळा सुरु झाला की डासांची पैदास जास्त होते.
Picture Credit: Pinterest
पावसाळ्यात पुरेसा सूर्यप्रकाश नसल्याने डासांमुळे आजारी पडण्याचं प्रमाण वाढतं.
पावसाळ्यात डास घरात येऊ नये म्हणून धूप आणि कापूर जाळला जातो.
याचबरोबर डासांच्या समस्येवर प्रभावी उपाय म्हणजे बाल्कनीत झाडं लावणं.
आयुर्वेदानुसार अशी काही झाडं आहेत जी लावल्यावर डास घरात प्रवेश करत नाही.
तुळशीचे आयुर्वेदात अनेक फायदे आहेत. याचबरोबर तुळशीचं रोप बाल्कनीत लावल्याने डास घरात येत नाही.
झेंडूच्या झाडाचा वास डासांना सहन होत नाही त्यामुळे हे झाड तुम्ही बाल्कनीत लावू शकता.
पुदीन्याचा उग्र वासापासून डास लांब पळतात, त्यामुळे बाल्कनीत पुदीन्याचं झाडं लावल्याने डास येत नाही.
डासांना पळवण्यासाठी बाजारात लव्हेंडर तेलाचा वापर केला जातो. या झाडाच्या वासाने डास लांब पळतात.