ऑक्टोबर हीट म्हणजेच शरद ऋतूची सुरुवात झाली आहे. यामुळे शरीराला आराम मिळविण्यासाठी पाण्याचे प्रमाण जास्त असलेली, शरीराला थंडावा देणारी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारी फळे खाणे अत्यंत फायदेशीर ठरते.
Picture Credit: Pinterest
या फळांमध्ये ८८ टक्क्यांपेक्षा जास्त पाण्याचे प्रमाण असते. त्यासोबतच भरपूर प्रमाणात विटॅमिन 'सी' असल्याने शरीराला त्वरित ऊर्जा मिळते, डिहायड्रेशन टळते आणि उन्हामुळे येणारा थकवा दूर होतो.
Picture Credit: Pinterest
आयुर्वेदानुसार ऑक्टोबरच्या उष्णतेमुळे शरीरात पित्त वाढते. डाळिंब हे पित्तशामक आणि उत्तम अँटीऑक्सिडंट आहे. हे फळ शरीरातील उष्णता कमी करण्यास आणि बदलत्या हवामानातील व्हायरल इन्फेक्शनपासून संरक्षण करण्यास मदत करते.
Picture Credit: Pinterest
Picture Credit: Pinterest
जरी हे फळ नसले तरी ऑक्टोबर हीटमध्ये नारळपाणी हे अमृतासारखे काम करते. यात नैसर्गिक इलेक्ट्रोलाइट्स असतात, जे कडक उन्हामुळे शरीरात कमी झालेले पाणी आणि रक्तातील घटकांचे प्रमाण संतुलित ठेवतात.
Picture Credit: Pinterest
ऑक्टोबर महिन्यात सीताफळाचा हंगाम सुरू होतो. हे नैसर्गिकरीत्या शरीराला ऊर्जा देणारे आणि चवदार फळ आहे. यामुळे शरीरातील अशक्तपणा दूर होण्यास मदत होते.
Picture Credit: Pinterest
या ऋतूत ताजे पेरू आणि सफरचंद बाजारात येऊ लागतात. पेरू मधील विटॅमिन 'सी' आणि फायबर पचनक्रिया सुधारतात, तर सफरचंद आरोग्यासाठी आवश्यक खनिजे पुरवून शरीराची प्रतिकारशक्ती मजबूत ठेवते.
Picture Credit: Pinterest
काकडीमध्ये ९५ टक्के पाण्याचे प्रमाण असते. शरीराला आतून थंड ठेवण्यासाठी आणि उष्णतेमुळे होणारी लघवीची जळजळ कमी करण्यासाठी रोजच्या आहारात काकडी खाणे अतिशय उत्तम.