उन्हाळ्यात घाम, ऊन आणि निर्जलीकरणामुळे त्वचा निस्तेज आणि कोरडी होऊ शकते. योग्य फळांचे सेवन केल्याने शरीराला पाणी, विटॅमीन आणि अॅण्टीऑक्सीडेंट मिळते.
Picture Credit: Pinterest
कलिंगडामध्ये भरपूर प्रमाणात पाणी असते. त्यामुळे ते शरीराला हाइड्रेड ठेवते आणि त्वचेला आतून आर्द्रता देऊन, तिला ताजे आणि चमकदार बनवते.
Picture Credit: Pinterest
पपईमध्ये विटॅमीन ए आणि एंजाइम्स असते. यामुळे अशुद्धी दूर होण्यास आणि मृत त्वचेच्या पेशी कमी होण्यास मदत होते, ज्यामुळे त्वचा स्वच्छ आणि चमकदार होते.
Picture Credit: Pinterest
आंब्यामध्ये विटॅमीन सी आणि बीटा कॅरोटीन असते. यामुळे कोलेजन तयार होण्यास मदत होते आणि त्वचा मऊ, निरोगी व चमकदार राहते.
Picture Credit: Pinterest
संत्र्यामध्ये विटॅमीन सी मोठ्या प्रमाणात असते. हे त्वचेला फ्री रॅडिकल्सपासून वाचवते आणि चेहऱ्याची नैसर्गिक चमक वाढवण्यास मदत करते.
Picture Credit: Pinterest
डाळिंब्यामध्ये अॅण्टीऑक्सीडेट्स असते. हे त्वचेच्या पेशींना होणाऱ्या नुकसानापासून वाचवते. याच्या नियमित सेवनाने त्वचेचा रंग सुधारतो आणि कांती निरोगी होण्यास मदत होते.
Picture Credit: Pinterest
कीवीमध्ये विटॅमीन सी आणि ईचे प्रमाण असते. हे त्वचेचे पोषण करते. डाग कमी करण्यास मदत करते आणि त्वचेला चमकदार बनवते.
Picture Credit: Pinterest