डोळ्यांचा नंबर कमी करण्यासाठी आहारामध्ये या गोष्टींचा समावेश करावा. हे शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. कोणत्या गोष्टींचे सेवन करावे, जाणून घ्या
गाजरांमध्ये बीटा कॅरोटीन असते. जे शरीरात व्हिटॅमिन ए मध्ये रूपांतरित होते. यामुळे डोळ्यांचा आजार दूर होतात.
पालकामध्ये ल्युटीन आणि झेक्सॅन्थिन नावाचे अँटीऑक्सिडंट्स असतात. हे घटक मोतीबिंदू आणि वयाशी संबंधित डोळ्यांच्या समस्या टाळण्यास मदत करतात.
फॅटी मासे जसे सॅल्मन, ट्यूना आणि मॅकरेलमध्ये ओमेगा ३ फॅटी अॅसिड भरपूर प्रमाणात असतात. ओमेगा 3 मुळे डोळे चांगले राहतात.
काजू आणि बिया जसे बदाम, अक्ररोड यांसारखा सुका मेवा खावा. यामध्ये व्हिटॅमीन ई आणि ओमेगा 3 असते. मोतिबिंदूसारखी समस्या दूर होते.
संत्री, लिंबू आणि हंगामी फळे यांसारखी लिंबूवर्गीय फळे व्हिटॅमिन सीने समृद्ध असतात.
अंड्यातील पिवळ्या भागामध्ये ल्युटीन, झेक्सॅन्थिन आणि व्हिटॅमिन ई असते. वयानुसार येणाऱ्या समस्या कमी करते
ब्रोकलीमध्ये व्हिटॅमीन ए, सी आणि ई यांच्याबरोबरच ल्युटीन असते. हे डोळे चांगले ठेवण्यास मदत करते.