आजच्या धावपळीच्या जगात शांतपणे बसून जेवायलाही वेळ नसतो.
एका अभ्यासानुसार पटापट खाल्ल्याने आरोग्यासंबधी समस्या उद्भवू शकतात.
तुमचे पोट भरले आहे हे मेंदूला समजण्यासाठीही 5 ते 20 मिनिटे लागतात.
त्यामुळे तुम्ही पटापट खाल्ल्यास तुमचा मेंदू सांगू शकत नाही की पोट भरलंय की अर्धवट आहे.
पटापट खाल्ल्याने वजन वाढण्याच्या समस्येलाही तोंड द्यावे लागते.
हळूहळू चावून खाल्ल्याने जास्त प्रमाणात इन्सुलिन रिलीज होते, ज्यामुळे तुमचे ग्लुकोज नियंत्रणात राहते.
पटापट खाल्ल्याने टाइप 2 डायबिटीजचा धोकाही वाढतो.
पटापट खाल्ल्याने पचनाच्या समस्यादेखील उद्भवतात.